तरुण भारत लाईव्ह । १५ ऑक्टोबर २०२३। ऑक्टोबर महिन्यात ग्रहाची उलथापालथ सुरु आहे. अशातच तूळ राशीत चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. मंगळ, केतु, बुध आणि सूर्य तूळ राशीत एकत्रित येणार आहेत. त्यात सूर्य आणि केतुच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होईल. विनाशकारी योगाचा प्रभाव काही राशींवर दिसून येईल. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
वृषभ रास
या काळात या राशींच्या लोकांना सांभाळून रहावे लागेल. कोर्ट प्रकरणात मोठा फटका बसू शकतो. प्रॉपर्टीविषयक कामात अडचणी निर्माण करेल. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
सिंह रास
या काळात सिंह राशींच्या लोकांना आर्थिक बाबतीत फटका बसू शकतो. जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. अपघात होण्याची शक्यता दिसत असल्याने वाहन जपून चालवावे. घरात छोट्याशा कारणाने मतभेद होऊ शकतात.
तूळ रास
या काळात तूळ राशींच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल.