तरुण भारत लाईव्ह । ५ ऑक्टोबर २०२३। ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत वेगाने गोचर करतो. त्यामुळे मनावर त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून येतो. चंद्राने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. यामुळे शशि राजयोग तयार झाला आहे. यामुळे काही राशीच्या लोकांना लाभ होणार आहे. तर कोणत्या आहे त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
वृषभ रास
या काळात वृषभ राशींच्या लोकांचा भाग्योदयाचा काळ असणार आहे. राजकारण आणि सरकारी नोकरी करत असलेल्याना विशेष लाभ होईल. अभ्यासात प्रगती दिसून येईल. व्यवसायात भरभराट होईल.
कर्क रास
या काळात कर्क राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होतील. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. कुटुंबासोबत सहलीला जायचा बेत ठरेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील.
वृश्चिक रास
या काळात वृश्चिक राशींच्या लोकांना बऱ्याच प्रमाणात फायदा होईल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याची चंगळ राहील. मनासारखी भेटवस्तू मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.