मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नेतृ्त्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रेचा अंतिम टप्पा जम्मू-काश्मीरमध्ये सुरू आहे. यादरम्यान राहुल गांधी यांनी एका मुलाखतील लग्नावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
“सध्या लग्नाचं प्लॅनिग करत आहे. लग्नासाठी चांगली मुलगी मिळाली तर लग्न करेन.” लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे, यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, “मला बायको म्हणून प्रेमळ आणि हुशार मुलगी हवी आहे.” लग्नाबद्दल काही अटी आहेत का, असं विचारल्यावर राहुल यांनी म्हटलं की, “मुलगी प्रेमळ आणि हुशार हवी. माझ्या घरचे लग्नाच्या विरोधात नाही. माझ्या आई-वडिलांचं लग्न सुंदर झालं होतं. ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचे. लग्नाच्या बाबतीत माझे विचार खूप उच्च आहेत. मी देखील अशाच मुलीच्या शोधात आहे.”