मुंबई : “गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून आम्ही शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर घेतोय. आता हे बेईमान लोकं यावर दावा सांगत आहे. मराठी माणसाची ताकद कमी करण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे. शिवसेनेच्या लोकांसमोर आव्हान उभं केलं जात आहे पण तुम्ही कितीही आव्हानं द्या किंवा दिल्लीतून आर्मी बोलवा आम्हाला काहीच फरक पडत नाही. दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे.” असा दावा संजय राऊत यांनी केला.
तर यावर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. आर्मी बोलवण्याच्या आव्हानावर संजय शिरसाट म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी जे हिंदुत्वाचे विचार मांडले होते. तेच विचार आम्हाला पुढे न्यायचेत म्हणून शिवतीर्थावर आम्हाला मेळावा घ्यायचा आहे.संजय राऊत यांच्यासाठी सैन्य कशाला हवं, दोन पोलीस पाठवले तरी संजय राऊत पळून जातील.” असे म्हणत संजय राऊतांना त्यांनी खोचक टोला लगावला आहे.