सर्वांची आत्मा हादरवेल अशी हृदयद्रावक घटना समोर आली आहे. २४ वर्षीय तरुणाने गळ्यात स्फोटके बांधून स्वत:ला उडवले. स्फोटानंतर तरुणाचे डोके शरीरापासून वेगळे झाले. याशिवाय संपूर्ण शरीरही इकडे-तिकडे विखुरले गेले. आता या घटनेनं सर्वच हादरले आहे. नीलेश मीना (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे.
घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या निर्जन ठिकाणी या तरुणाने गळ्यात स्फोटक बांधून आत्महत्या केली. स्फोट झाला तेव्हा आसपासच्या लोकांनी तिथे जाऊन तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न असल्याचे पाहिले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावेही गोळा केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक हा मजुरीचे काम करत होता. त्याचे वडील शेतकरी आहेत.
मृताच्या कुटुंबात एक मोठी व लहान बहीणही आहे. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ऋषभदेव रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे. मात्र, तरुणाने आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, आता या तरुणाने एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके कुठून आणि कशी आणली याचा पोलीस कसून तपास करत आहेत. राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील ऋषभदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हृदयद्रावक घटना घडली.