जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच लग्नाचे आमिष दाखवत २३ वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिसांत एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रानुसार, भुसावळ शहरातील एका भागात २३ वर्षीय तरूणी वास्तव्याला आहे. सध्या ती शिक्षण घेत आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये तिची ओळख उमेर शेख मोहसीन शेख याच्याशी झाली होती. त्याने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.
दरम्यान, तरुणी लग्नाची मागणी करताच त्याने लग्नास नकार दिला. अत्याचार करून आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून उमेर शेख मोहसीन शेख याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे करीत आहे.