…तर आगारप्रमुखांवरच होणार कारवाई; १ ऑक्टोबरपासून होणार तपासणी

राज्यातील एसटी बसस्थानक परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ या स्पर्धेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच महिन्यांपूर्वी केली आहे.

अर्थात मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटी संचालक मंडळाच्या बैठकीत बसस्थानक, स्वच्छतागृहे, स्थानक परिसर स्वच्छ व टापटीप ठेवण्यासाठी स्पर्धात्मक अभियान राबवण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही एसटीच्या अस्वच्छ बसेस रस्त्यावर दिसत आहे. मात्र आता बस किंवा बस स्थानक जर अस्वच्छ असेल तर आगार प्रमुखालाच महागात पडणार आहे.

व्यवस्थापकाला ५०० रुपयांचा दंड
कारण अस्वच्छ बसेस दिसल्यास आगार व्यवस्थापकाला ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. असा आदेश आता महामंडळाकडून काढण्यात आला आहेत. राज्यभरात 1 ऑक्टोबरपासून एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत स्वच्छतेची तपासणी सुरू होणार आहे.

स्वच्छतेसाठी शंभर पैकी दहा गुण
या अभियानात बसेसच्या स्वच्छतेसाठी शंभर पैकी दहा गुण दिले जाणार आहेत. अभियान सुरू होऊन तब्बल पाच महिने होऊनही अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने एसटी महामंडळ प्रशासनाकडून, एस टी आगारातील अधिकारी एस टी बस स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत आहेत.