…तर आता थेट जाल कारागृहात; वाचा, स्वतःला वाचवा

नंदुरबार : मोटारवाहन निरीक्षकांना बॉडी कॅमेरे देण्यात येणार आहेत. यामुळे वाहन निरीक्षकांसोबत पावती फाडल्याच्या कारणातून वाद घालणाऱ्यांना सरळ जेलची हवा खावी लागणार आहे. रस्ते वाहतुकीला शिस्त लावत वाहनांची तपासणी करणाऱ्या वाहन निरीक्षकांकडून सातत्याने वाहनांची तपासणी केली जाते. यादरम्यान काहींकडून अधिकाऱ्यांसोबत वाद घालण्याचे प्रकार केले जातात. हे प्रकार थांबवण्यासाठी आरटीओंना आता कॅमेरे देण्यात येणार आहेत. हे कॅमेरे खांद्यावर लावले जाणार असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील बेडकी ता. नवापूर, गव्हाळी तसेच खेडदिगर ता. शहादा येथे राज्य सीमा तपासणी नाक्यावर अधिकाऱ्यां सोबत वाद घालण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात वाढले आहेत. शासनाकडून अद्याप कॅमेरे पुरवठा करण्यात आलेला नाही. येत्या काळात कामकाज केले जाईल, अशी माहिती जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली.

जिल्ह्यात सीमा तपासणी नाक्यांवर मिळणार कॅमेरे
जिल्ह्यात तीन राज्य सीमा तपासणी नाक्यांवर कॅमेरे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सोबत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कॅमेरे मिळतील.

कॅमेऱ्यातील चित्रीकरण पुरावा म्हणून ग्राह्य
आरटीओ अधिकाऱ्याच्या कॅमेऱ्याात आलेले चित्रीकरण यापुढे पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

१० तासांचे स्टोरेज असणार कॅमेऱ्यात
बॉडी कॅमेऱ्यात १० तासांचे स्टोरेज राहणार असल्याचे सांगण्यात आले आले आहे.