…तर तुम्हीही असू शकता या आजाराने ग्रस्त!

मुंबई : काहीजणांना खाल्ल्यानंतर लगेचच भूक लागते. अशी उदाहरणे आपण पाहतच असतो. जर तुम्हालाही अन्न खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा भूक लागते. पोट भरल्यानंतरही काही खावेसे वाटते का, तर काळजी घ्यावी. कारण ते सामान्य नसून अनेक रोगांचे लक्षण आहे. वारंवार भूक आणि खाल्ल्याने वजन वाढू शकते. इतरही अनेक समस्या याला कारणीभूत ठरू शकतात. अन्न खाल्ल्यानंतर भूक लागण्याचे कारण काय असू शकते ते जाणून घेऊया. तुम्हाला पुढील आजार जडण्याची शक्यता नाकरता येत नाही. जेवणानंतर लगेच भूक लागण्याची सर्वसाधारण कारणे त्याचबरोबर संभावित आजार पुढीलप्रमाणे:

खराब झोप

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, झोप न लागल्यामुळेही वारंवार भूक लागते. प्रत्येकाने किमान ७ ते ८ तासांची झोप घेतली पाहिजे. हे मेंदू आणि रोगप्रतिकारक शक्ती योग्य ठेवण्यास मदत करते. चांगली झोप घेतल्याने पचनक्रियाही सुधारते. जेव्हा झोप पूर्ण होत नाही, तेव्हा भूकेचे संकेत देणारे घेरलिन हार्मोन वाढते. त्यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागते. त्यामुळे चांगली झोप आणि पुरेशी झोप घ्या.

मधुमेह

जास्त भूक लागणे हे देखील मधुमेहाचे कारण असू शकते. मधुमेहाच्या रुग्णाच्या पेशींपर्यंत ग्लुकोज पोहोचत नाही, त्यामुळे ऊर्जा बनण्याऐवजी ते लघवीद्वारे बाहेर जाते. कधी कधी साखरेची पातळी जास्त असली तरी भूक लागते. अशा परिस्थितीत साखरेची पातळी एकदा तपासली पाहिजे.

थायरॉईड

थायरॉईडच्या रुग्णांनाही वारंवार भूक लागते. जेव्हा थायरॉईड संप्रेरकांची पातळी वाढते तेव्हा हायपरथायरॉईडीझम होतो. हा ग्रेव्हस रोग आहे. अशा स्थितीत व्यक्तीला पोट रिकामे असल्याचे जाणवते आणि काहीतरी खावेसे वाटते.

प्रथिने कमतरता

जर तुम्ही तुमच्या आहारात पुरेसे प्रथिने घेत नसाल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक लागण्याची शक्यता आहे. कारण प्रथिनांच्या साहाय्याने फक्त तेच हार्मोन तयार होते, जे भूक भागवण्याचे संकेत देते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार, अन्नामध्ये पुरेशा प्रमाणात प्रथिने असल्यास तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. अशा स्थितीत अन्न खाल्ल्यानंतरही भूक लागत असेल तर प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

ताण

जास्त ताण हे देखील भूक लागण्याचे कारण आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जास्त तणावामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन वाढतो. त्याचा थेट परिणाम भूकेवर होतो. डिप्रेशन, अॅन्झायटी डिसऑर्डरमध्येही भुकेची समस्या अधिक असते.