…तर प्रवाशांना मिळणार शंभर रुपयाचे बक्षीस, लगेच जाणून घ्या!

पुणे : बेशिस्त वाहनांमुळे अनेकदा अपघात झाल्याचे समोर आले आहे. मात्र आता पीएमपीचे नवीन अध्यक्ष सचिंद्र प्रतापसिंह यांनी नवीन उपक्रम हाती घेतला आहे. विशेषतः यामुळे चालक-वाहकांमध्ये सुधारणा होणार आहे तसेच प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार आहे.  

काय उपक्रम आहे?
बेशिस्त चालकाची तक्रार करणाऱ्या प्रवाशांना आता पीएमपीकडून शंभर रुपयाचे बक्षीस मिळणार आहे.  प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी आणि चालक-वाहकांमध्ये सुधारणा व्हावी, याकरिता हा उपक्रम राबवला जात आहे.

बक्षीस कोण देणार?
चालकाने केलेल्या बेशिस्तपणाबद्दल त्याच्या पगारातून दंडाची रक्कम वजा करण्यात येणार आहे. यामधील रक्कम तक्रारदार प्रवाशाला बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे पीएमपीचे नवे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

प्रत्यक्ष प्रवास करून पाहणी…
पीएमपी अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदभार स्वीकारताच गेले दोन-तीन दिवस पीएमपीच्या सेवेची प्रत्यक्ष प्रवास करून पाहणी केली. यादरम्यान सिंह यांना अनेक चालक बेशिस्तपणे काम करत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नवीन अध्यक्षांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.