---Advertisement---

तर भाजपा – राष्ट्रवादी युती झाली असती; गुलाबराव पाटील यांचा मोठा दावा

---Advertisement---

जळगाव । एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असा दावा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती, सकाळी कोंबडा बांग देतो तशी ती वेळ होती, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. 

शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर सरकार कोसळेल असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. यावरही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारचे सांगितले जात आहे. मात्र, आमचे सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला आहे. 

ज्या घरात वाढले, ज्या घराने ओळख दिली त्या घरात गद्दारी करणं चुकीचं आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते. त्यावरही त्यांनी पलटवार केला आहे. आम्ही पक्ष कुठे सोडला आहे? आम्ही मूळ शिवसेना आहोत. बोर्डावर पक्षाचे नावही तेच आहे. आम्ही भाजपमध्ये गेलो का? आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत, असा दावा त्यांनी केला. 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment