चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत मोबाईल निर्यातीचा आकडा 5.5 अब्ज डॉलर आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात हा आकडा केवळ २.२ अब्ज डॉलर होता, अशी माहिती इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनच्या अहवालाने दिलीय.
मोदी सरकारच्या पीएलआय योजनेमुळे भारत जगातील दुसरे सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनले आहे. आता भारत फक्त चीनच्या मागे आहे. त्याचा पराभव करण्यासाठी अॅपलचा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. त्यानंतर भारत या बाबतीत जगातील नंबर 1 देश बनेल.
दुसरीकडे, ताज्या अहवालानंतर चीनची चिंता वाढली आहे. त्यालाही कारण आहे. परदेशी कंपन्या चीनमधून सतत पॅकिंग करून भारत किंवा इतर देशांकडे जात आहेत. सध्या जागतिक स्तरावर मेक इन इंडिया आयफोनचा वाटा वाढत आहे.
अॅपलचा भारतात प्रवेश झाल्यापासून आणि मोदी सरकारने या क्षेत्रात पीएलआय योजना सुरू केल्यापासून, भारत मोबाइल उत्पादनात सतत प्रगती करत आहे. चीनच्या विपरीत भारताने जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यामुळे अॅपल केवळ उत्पादन क्षेत्रातच नव्हे तर रिटेल आघाडीवरही भारतात स्वतःचा विस्तार करत आहे. यामुळेच भारत सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल हब बनला आहे. काउंटरपॉईंट डेटानुसार, 2023 मध्ये भारतात एकत्रित केलेल्या एकूण मोबाइल फोनपैकी 22 टक्के निर्यात करण्यात आले आहेत.