तुम्ही तुमच्या फास्टॅगमध्ये अद्याप केवायसी अपडेट केले नसेल, तर आजच ते पूर्ण करा. यासाठी ३१ मार्च म्हणजेच आजचा हा शेवटचा दिवस आहे. तुमचा फास्टॅग केवायसी डेडलाइनपर्यंत अपडेट न केल्यास तुम्हाला टोल प्लाझावर अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कारण १ एप्रिलपासून तुमचा फास्टॅग निष्क्रिय होणार आहे.
फास्टॅग केवायसीची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. फास्टॅग निष्क्रिय केल्यास दुप्पट टोल टॅक्स भरावा लागेल. फास्टॅग केवायसी अपडेट करण्याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या..
फास्टॅगचे केवायसी अपडेट करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम बँकेशी संलग्न फास्टॅग वेबसाइटवर जा.
तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून लॉग इन करा आणि OTP टाका.
My Profile विभागात जा आणि KYC टॅबवर क्लिक करा.
पत्ता पुरावा सारखे आवश्यक तपशील भरल्यानंतर सबमिट करा. अशा प्रकारे केवायसी पूर्ण होईल. आता तुमची KYC स्थिती KYC पेजवर दिसेल.
फास्टॅग स्टेटस कसे तपासायचे?
तुम्ही fastag.ihmcl.com वर जाऊन फास्टॅग स्टेटस तपासू शकता.
जेव्हा वेब पृष्ठ उघडेल, तेव्हा तुम्हाला वेबसाइटच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या लॉगिन टॅबवर क्लिक करावे लागेल.
लॉग इन करण्यासाठी, तुम्हाला OTP साठी नोंदणीकृत मोबाइल नंबर द्यावा लागेल.
लॉग इन केल्यानंतर, डॅशबोर्डवरील My Profile विभागात क्लिक करा.
माय प्रोफाइल विभागात, तुम्हाला तुमच्या FASTag ची KYC स्थिती आणि नोंदणी प्रक्रियेदरम्यान सबमिट केलेले प्रोफाइल तपशील देखील आढळतील.
तुम्ही तुमच्या बँकेच्या वेबसाइटवरूनही हे करू शकता.
फास्टॅग केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे
वाहन नोंदणी प्रमाणपत्र
आयडी पुरावा
पत्त्याचा पुरावा
एक पासपोर्ट साइज फोटो
पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड हे ओळखपत्र आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी वापरले जाऊ शकतात.