मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे बडेनेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, काँग्रेसने तांबे यांना निलंबित केल्यानंतर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपामध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती त्यानंतर थोरात यांनी आज मंगळवारी राजीनामा दिल्यानंतर त्यांना देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
बाळासाहेब थोरात एवढे लहान नेते नाहीत की त्यांना ऑफर दिली तर येतील. त्यांना आम्ही कुठलीही ऑफर देणार नाही. कुणालाही भाजपमध्ये यायचे असेल तर त्यांच्यासाठी दरवाजे उघडे असतील आणि त्यांना योग्य सन्मान दिला जाईल. थोरातांची उंची मोठी आहे, त्यांना भाजपमध्ये यायचे असेल तर योग्य सन्मान देण्यात येईल असे बावनकुळे म्हणाले.