तीनसमाळ ग्रामस्थ का आक्रमक झालेय; काय आहेत मागण्या ?

धडगाव : तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या तिनसमाळ गावात मूलभूत सुविधांची वणवा आहे. त्यातच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर झालेला रस्ता केवळ कागदावरच असल्याचे भीषण वास्तव समोर आलं आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकंनी स्वतः रस्ता दुरुस्ती करायला सुरवात केली आहे.

ग्रामस्थांना नेमही बाजारपेठ, दवाखान्यासाठी धडगाव शहरात येजा करावे लागते. मात्र रस्त्यावरून केव्हा गाडी घसरून दरीत जाईल याची शाश्वती नाही. त्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन रस्ता तात्पुरता दुरुस्त केला आहे. मात्र, आता शासन प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी आता ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचं ठरविलं आहे.

प्रशासनाने दखल घेण्यासाठी तालुक्यातील आणि जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट द्यावी. एसीच्या खुर्शीत बसून विकास दिसतो. मात्र, वास्तविकता जाणण्याची अत्यंत गरज आहे, असं ग्रामस्थांनी म्हटलं आहे.