मुलींच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये छुपा कॅमेरा सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंघोळ करताना मुलींचा खाजगी व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात वसतिगृहातील तरुणी आणि तिच्या प्रियकरावर आरोप करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसात तक्रार केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला असून आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलीला अंघोळ करताना वॉशरूममध्ये लावलेल्या गिझरवर छुपा कॅमेरा दिसला. मुलीने त्याला पाहताच संपूर्ण वसतिगृहात एकच गोंधळ उडाला. वसतिगृह चालकाने तातडीने या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल केली. वसतिगृहात राहणाऱ्या एका तरुणीवर इतर मुलींच्या आंघोळीचा व्हिडिओ बनवून प्रियकराकडे पाठवल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ कॅमेरा आणि महिलेचा मोबाइल सीएफएसएल लॅबमध्ये पाठवला असून तेथे त्याची कसून तपासणी केली जाईल. पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 354 सी, आयटी कायद्याच्या 509 आणि 66 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हे प्रकरण चंदीगड विद्यापीठापर्यंत पोहोचले
गेल्या वर्षी मोहाली येथील चंदिगड विद्यापीठातही असाच प्रकार समोर आला होता. जिथे शेकडो विद्यार्थी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात उतरले होते आणि प्रचंड गदारोळ झाला होता. वसतिगृहात राहणाऱ्या मुलींचे खासगी व्हिडिओ लीक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थिनी आणि तिच्या प्रियकराला अटक केली होती. पोलिसांच्या प्रयत्नानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन संपवले.