Lost the phone : आपण आपला फोन कुठेही ठेवून विसरतो, मग शोधूनही तो सापड नसतो. अशा परिस्थितीत तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर आता घाबरण्याची गरज नाहीय. आता सरकार तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन शोधून परत आणेल. होय, कसं ते जाणून घेऊया.
आजकाल आपण सर्व प्रकारची माहिती आपल्या फोनमध्ये ठेवतो. बँकेच्या तपशिलांपासून ते तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्रांपर्यंत, तुम्ही ते तुमच्या फोनमध्येच ठेवता. आता फोन हरवला किंवा चोरीला गेला तर मोठी अडचण होते. यावर उपाय म्हणून सरकारने एक पोर्टल सुरू केले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन परत मिळवू शकता.
केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच लोकांचे फोन आणि डेटा चोरीवर उपाय शोधला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संचार साथी पोर्टल लाँच केले आहे. ज्याचा उद्देश लोकांच्या चोरीच्या वस्तू शोधणे हा आहे. मात्र, 17 मे पासून लोकांना त्याची सेवा मिळणार आहे. वास्तविक, 17 मे हा जागतिक दूरसंचार दिन आहे, त्यानिमित्ताने संचार साथी पोर्टल देखील लोकांसमोर आणले जाईल.
या पोर्टल अंतर्गत, वापरकर्ते त्यांचा फोन शोधू शकतात तसेच तो ब्लॉक करू शकतात. यासोबतच ते त्यांच्या कार्डवर किती क्रमांक सक्रिय आहेत हे देखील तपासू शकतात. अॅपलच्या Find My Phone या वैशिष्ट्याप्रमाणे, आता लोक त्यांचा Android फोन कुठे, कधी आणि कसा वापरला गेला हे एका चुटकीसरशी शोधू शकतात.