धुळे : पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन देता कामा नये. विनापरवाना वाहन चालविताना मुले सापडल्यास पालकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, अशी तंबी उपअधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांनी दिली.
दरम्यान, पोलिसांनी शहरात अचानक मोहीम राबवत त्यात ९ मुलांना विनापरवाना वाहन हाकताना पकडण्यात आले. संबंधितांना प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे दंड ठोठावण्यात आला.
शहरात शाळकरी मला-मुलींच्या हाती वाहने पडली असून ते रस्त्यावर सुसाट सुटतात. त्यामुळे अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत.
वास्तविक अल्पवयीनांना वाहन सोपविणे कायद्याने गुन्हा आहे. धळ्यात अशा प्रकारे नियममोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कार्यवाही करण्याचे सत्र सुरू झाले आहे.
शहर उपअधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत ९ अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून आली. त्यांच्या पालकांना प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे दंड ठोठावण्यात आला. तसेच काही अल्पवयीन मुले वाहनासह सापडल्याने त्यांच्या पालकांना शहर वाहतूक शाखेत समज देण्यात आली.