तुमच्याकडे दोन हजाराची नोट आहे का? मग तुम्हाला काय पर्याय आहे, नीट समजून घ्या!

RBI announcement today : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. इथून पुढे २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे.  त्यामुळे ज्यांच्याकडे 2000 नोटा आहेत त्यांच्यासमोरील पर्याय काय आहे? ते जाणून घ्या.

2000 रुपयांची नोट चलनात बंद होईल मात्र 2000 रुपयांची नोट कायदेशीररित्या वैध राहील. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. तसेच, बँका आणि RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा इतर मूल्यांच्या चलनासोबत बदलता येणार आहेत.

पर्याय काय?
2000 रुपयांच्या नोटा बँक खात्यात जमा करू शकतात किंवा बँकेच्या शाखेत जाऊन इतर नोटांद्वारे बदलू शकतात.
बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. बँका याबाबत स्वतंत्रपणे नियम जारी करतील.
23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलता येतील.
ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलू शकतात.
आरबीआयने यासंदर्भात बँकांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
23 मे 2023 पासून, RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत, 2000 रुपयांची देवाणघेवाण करता येईल.
RBI ने सर्वसामान्य लोकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे.