देशातील लाखो नागरिकांचे आज शुक्रवारी दुपारी 12 वाजता फोन वाजले. जो तो त्याच्या कामात गुंग असताना अनेक नागरिकांच्या मोबाईलची रिंग वाजली. तुमच्या पण फोनवर हा इमर्जन्सी अलर्ट वाजला असेल. त्यामुळे मोबाईलमध्ये मोठ्याने बिप आवाज झाला. फ्लॅश मॅसेजमुळे ही रिंग वाजली. या मॅसेजचा अर्थ असा नाही की, एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती आली. तर केंद्र सरकार सध्या नागरिकांना टेस्टिंग मॅसेज पाठवत आहे.
केंद्र सरकारमधील दूरसंचार विभागाच्या ब्रॉडकास्टिंग सिस्टमद्वारे हा मॅसेज पाठवण्यात आला आहे. या फ्लॅश मॅसेजमध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की, हा मॅसेज दुर्लक्षित करा. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी काहीच करु नये.
दूरसंचार विभागाने हा मॅसेज का पाठविण्यात आला, याची माहिती दिली आहे. त्यानुसार, हा केवळ चाचणी संदेश आहे. टेस्टिंग मॅसेज आहे. तो ब्रॉडकास्टिंग सिस्टमद्वारे पाठविण्यात आला आहे. सध्या या मॅसेजची चाचपणी सुरु आहे.
हा मॅसेज पाठविण्यामागे भविष्यात भूकंप, महापूर वा इतर नैसर्गिक आपत्ती कोसळल्यास नागरिकांना अलर्ट करण्यात येणार आहे. या मॅसेजनुसार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, NDMA ने संपूर्ण भारतासाठी ही आपत्कालीन स्थितीत संदेश पाठविण्यासाठीची व्यवस्था केली आहे.