---Advertisement---

तुम्हीही करताय ‘हे’ काम ? सावधान… ४३ जणांवर गुन्हा

---Advertisement---

धुळे : शिरपूर तालुक्यात सहा लाखांची वीज चोरी करणाऱ्या ४३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत वीज देयके न भरल्याने ही कारवाई करण्यात आली.

तन्हाडी येथे १३ हजार ३१७ युनिटची एकूण दोन लाख ९० हजार १२ रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी गावातील १५ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. तसेच ८ हजार ७७३ युनिट वीज वापरून एक लाख ८३ हजार ७० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी याच गावातील १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोंढरे गावातही १३ हजार ८११ युनिट, २ लाख २२ हजारांची वीज चोरी करण्यात आली.

याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. २९७ युनिट वीज चोरी केल्याप्रकरणी वरूळ येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबरोबरच वरूळ गावातील चार जणांनी एकूण चार हजार ७९१ युनिटचा वापर करीत ८० हजार एकोणीस रुपयांची वीज चोरी केली. चौघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment