मुंबई | अजित पवार गटाने जराही भीडभाड न ठेवता थेट शरद पवारांवर हल्ला चढवणं सुरु ठेवलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांना हात घातला. शरद पवार आणि भाजपशी बोलणी, या मुद्द्यावर बोलतांना छगन भुजबळ म्हणाले, एक-दोन वेळा ठिक आहे पण शरद पवारांनी अनेकदा भाजपशी बोलणी केली. चार-पाच वेळा त्यांनी भाजपसोबत जाण्यासंबंधी बोलणी केली आणि पुन्हा माघार घेतली. चर्चा करता परत मागे येता, एकदा ठिक आहे परंतु नेहमी नेहमी का असं करता? भाजपशी चर्चा करुन सातत्याने शब्द फिरवल्याचं भुजबळांनी थेट सांगितलं.
पत्रकार परिषदेत भुजबळ म्हणाले की, एखाद्याला शब्द देऊन एकदा-दोनदा फिरवला तर ठीक पण सातत्याने शब्द फिरवला तर समोरच्याला आपल्या पक्षाबद्दल, नेत्यांबद्दल राग येणे स्वाभाविक आहे. एकतर चर्चा करू नका, चर्चा करून मागे फिरता. हे सातत्याने घडत होते. विठ्ठलाच्या बाजूला बडवे असतात. २-४ लोक होती त्याप्रमाणेच होत होते. सूचना करूनही काहीच घडत नव्हते. अजित पवारांनी उघडपणे याबाबत वाच्यता केली. त्यानंतरही सगळे मोघम ठेवण्यात आली. चर्चा झाली नाही. ऑफिसमध्ये १०-१२ वर्ष काम करणारे कार्यालयीन पदाधिकारी हेसुद्धा तिथून का सोडून आले त्याला काही कारणे आहेत. नको ती माणसे डोक्यावर नेमली गेली. २-४ लोकांना घेऊन पक्ष चालवायला लागले तर ही सगळी माणसे मनातून दुखी होऊन दुसरीकडे वाट शोधतात. त्यांना अजित पवारांची वाट मिळाली आणि ते आले असं भुजबळांनी सांगितले.
सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी सगळ्या कायदेशीर बाबी तपासल्या आहेत. पूर्ण अभ्यास करुनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. आम्ही सरकारमध्ये सामील होण्याअगोदर याबाबत जी कागदपत्रे, सह्या आहेत त्या केलेल्या आहेत. निवडणूक आयोगासमोर दाखल केलेत. अजित पवार पक्षाचे प्रमुख आहेत आणि यापुढे राहतील असे सांगितले आहे. पक्षाची घटना, निवडणूक आयोगाचे नियम या सर्व गोष्टींची चर्चा करून त्याची मांडणी करण्यात आली आहे. आम्ही शेवटपर्यंत काही मार्ग निघतोय का यासाठी प्रयत्न केला. सुप्रिया सुळेही होत्या. सर्व आमदार, अजित पवार आणि नेते, सुरुवातीला जयंत पाटील, सुप्रिया सुळेंशीही चर्चा झाली. महिना-दोन महिने चर्चा सुरू होती. काल काही गोष्टी अजित पवारांनी उघड केल्या. शेवटपर्यंत काही मार%LS