तुर्कस्तान : तुर्कस्ता आज सोमवारी भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरला आहे. यामुळे अनेक इमारती कोसळल्या असून आतापर्यंत 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच सीरियामध्ये जीव गमावलेल्यांचा आकडा 90 वर पोहोचल्याची माहिती आहे. 500 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रानुसार, तुर्कस्तान आज सोमवारी भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरला. नूर्दगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली. मात्र, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची तीव्रता 7.5 एवढी ठेवली आहे.
तुर्कस्तानातील भूकंपाचा परिणाम सीरियापर्यंत
मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानातील भूकंपाचा परिणाम सीरियापर्यंत दिसून आला असून यामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. तुर्कीमध्ये आतापर्यंत 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सीरियात जीव गमावलेल्यांचा आकडा 90 वर पोहोचल्याची माहिती आहे. 500 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.