‘तुला तुझ्या आईने दूध पाजले असले तर ये जामनेरमध्ये’, संजय पवारांचे थेट कुणाला आव्हान ?

जळगाव : ‘तू काय गिरीश महाजनांना चॅलेंज देशील; तुला तुझ्या आईने दूध पाजले असले तर ये जामनेरमध्ये आणि प्रूफ करून दाखव. असे थेट आव्हान जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी नाव न घेता माजी खासदार उन्मेष पाटील यांना केले.

दरम्यान, माजी खासदार उन्मेष पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय पवार यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांना थेट आव्हान केले आहेत.

महायुतीच्या जळगाव व रावेर मतदारसंघाच्या उमेदवारांचे नामांकन अर्ज आज दाखल करण्यात आले. यावेळी महायुतीतर्फे महाविजय रथ रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यलयासमोर करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले होते उन्मेष पाटील ?
गिरीश महाजन हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीही केलेले नाही, शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळाले नाही,पोखरा योजनेचा लाभ मिळालेला नाही, गिरणा बलून बंधाऱ्यासाठी निधी मिळवू शकलेले नाहीत. कॅबिनेटमध्ये त्यांनी हे विषय कधीच लावून धरलेले नाहीत, कॅबिनेटची बैठक होते त्यावेळी हे झोपा काढत असतात. बाहेर मात्र आपल्यावर टीका करीत असतात त्यांनी आता तोंड सांभाळून बोलावे आपण अधिक खोलात गेलो तर त्यांना जामनेरमधून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा उन्मेष पाटील यांनी गिरीश महाजनांना दिला होता.