तुषार दोशी सक्तीच्या रजेवर : जालना पोलिस अधीक्षक पदाचा पदभार ‘या’ अधिकाऱ्याकडे

जालना  :  जालन्याच्या आंतरवाली गावात झालेल्या लाठीहल्ल्यामुळे पोलिसांवर संताप व्यक्त होत आहे. या घटनेमध्ये अनेक आंदोलक आणि पोलिसदेखील जखमी झालेले आहेत. सरकारने कारवाई करत पोलिस अधीक्षक (Jalna Superintendent of Police) तुषार दोशींना आज सक्तीच्या रजेवर (forced leave) पाठवलं होतं.

तुषार दोषींच्या जागेवर नवीन आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयपीएस शैलेश बलकवडे हे जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक असतली. जालन्यातील मराठा आंदोलनामुळे राज्यभर वातावरण पेटलेलं आहे. त्यामुळे जालन्यात शांतता ठेवण्याचे प्रमुख आव्हान सरकारसमोर आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी आंदोलकांशी फोनवरुन चर्चा केलीय. मराठा आरक्षणप्रश्नी आपण तोडगा काढू, शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, असं आवाहन फडणवीसांनी मनोज जरांगेंना केल्याची माहिती आहे.