“तू चांगली आहेस का? किती पैसे हवे आहे” म्हणत सतत फोन करायचा, महिलेनं गाठलं पोलीस स्टेशन, पुढे काय घडलं?

जळगाव : महिलेस तू चांगली आहेस का? तुला किती पैसे हवे आहे. मी तुझ्या घरी येणार होतो, असे म्हणत महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जामनेर तालुक्यात ही घटना घडलीय. याबाबत पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दिलीय.

पोलीस सूत्रानुसार, जामनेर तालुक्यात एका गावात राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेस अब्दुल गणी याने  १६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आठवडे बाजारात “तू चांगली आहेस का? तुला किती पैसे हवे आहे. मी तुझ्या घरी येणार होतो, असे म्हणत महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच वारंवार फोन नंबर मागून त्रास दिला.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अब्दुल गणी याच्याविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ किरण शिंपी करीत आहे.