failed student : भरपूर परिश्रम घेतल्यानंतर देखील अनेकांना अपयशाला सामोरं जावं लागतं. त्यातून अनेक जण पुन्हा अथक परिश्रम घेत यशस्वी होतात तर काही खचून जाऊन नको ते पाऊल उचलतात. अश्या विद्यार्थ्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. असाच एक उपक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. अर्थात बारावी परीक्षेत नापास विद्यार्थ्यांसाठी फेल्युअर पार्टीचं आयोजन आलं आहे. आता आयुक्तांच्या या उपक्रमाचं राज्यभरात कौतुक होत आहे.
छत्रपती संभाजी नगरचे महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी बारावी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एका पार्टीचं आयोजन केलेलं आहे. ‘फेल्युअर पार्टी’ असं नाव या पार्टीला देण्यात आलेलं आहे. येत्या ६ जून रोजी ही पार्टी संपन्न होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील १३,८३६ नापास झालेले किंवा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेल्युअर पार्टीचं आयोजन केलेलं आहे. >६ जून रोजी सकाळी १० वाजता सिडको एन-५ येथील लाइट हाऊस, धर्मवीर संभाजी शाळेच्या शेजारी फेल्युअर पार्टीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. महापाविका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या या उपक्रमाचं राज्यभरातून कौतुक होत आहे.