तोयबाच्या दोन अतिरेक्यांना अटक, हातबॉम्बसह पिस्तूल जप्त

श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या अन्य एका शोधमोहिमेत लष्कर-ए-तोयबाच्या दोन अतिरेक्यांना जवानांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून दोन हातबॉम्ब आणि आठ पिस्तूल जप्त करण्यात आले.

सोपोर जिल्ह्यातील शेर कॉलनी भागात काही अतिरेकी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त तपास नाका उभारला. जवानांना पाहताच दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, जवानांनी पाठलाग करून त्यांना पकडले, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली. मंझूर अहमद आणि तन्वीर अहमद अशी अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांची नावे आहेत. आपण तोयबाचे सदस्य असल्याची कबुली त्यांनी जवानांना दिली.