उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अजितदादा अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलं. आता तुम्ही नवनीत राणा यांना मतदान करा. आम्ही जर तुमचे कामे केले नाही तर आम्हाला विधानसभेमध्ये उभे करू नका. आम्हाला चले जावं म्हणा, असं सांगतानाच विरोधक नवनीत राणा यांच्यावर आरोप करतात. जे आरोप करतात त्यांच्या घरी आईबहिणी नाही का ? असा सवाल अजित पवार यांनी केला.
‘त्या’ आरोप करणाऱ्यांवर अजित पवार भडकले, म्हणाले…
Updated On: एप्रिल 29, 2024 10:57 am

---Advertisement---