‘त्या’ मनसैनिकांचा शोध सुरु; पोलिसांकडून कठोर कारवाईची शक्यता

ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाण्यात काल १० रोजी रात्री मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेण आणि बांगड्या फेकल्याचा प्रकार घडला. त्यामुळं ठाण्यात रात्रभर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं दिसून आलं.

उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी गडकरी रंगायतनमध्ये पोहोचले असताना हा हल्ला झाला. उद्धव ठाकरे ज्या वाहनातून प्रवास करत होते त्यावर शेण फेकण्यात आले. या हल्ल्यात 16 ते 17 वाहनांवर नारळ फेकण्यात आले.

बीडमध्ये उद्धव गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर टोमॅटो आणि सुपारी फेकली, त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकलय.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन सोडण्यात आल्यानंतर रात्री उशिरा नौपाडा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर पोलिसांनी सोडून दिलेल्या या महाराष्ट्र सैनिकांचा शोध पुन्हा सुरु केल्याची माहिती आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांवर कठोर पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे.