थरारक घटना! दर्शना पवार हत्याप्रकरण ताजे असतानाच पुण्यात “MPSC’च्या तरुणीवर कोयत्याने हल्या

Crime News Pune : दर्शना पवार हत्याप्रकरण ताजे असतानाच पुण्यातील प्रसिद्ध ठिकाण सदाशिव पेठ येथे एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर एमपीएससी करणाऱ्या तिच्या मित्राने कोयत्याने हल्ला केला. पादचाऱ्यांमुळं तरुणी वाचली. या हल्ल्यात तरुणीला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर तरुणीनं माध्यमांशी संवाद साधला.

या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. हल्ला झाल्यानंतर ही तरुणी जीव मुठीत धरून धावायला लागली. मात्र तिच्या मागे कोयता घेऊन धावणार्‍या तरूणाला पाहुन कोणीच मदतीला पुढ आलं नाही. जखमी अवस्थेत ती मुलगी धावत होती. एवढ्यात लेशपाल जवळगे नावाच्या तरुण त्या मुलीच्या मदतीला धावला. कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार एवढ्यात लेशपाल जवळगेने कोयता पकडला आणि हल्लेखोर तरणाला रोखले. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला.त्यानंतर पोलीसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलय.

दरम्यान, हल्ला करणारी व्यक्ती माझ्या परिचयाची होती. माझा काही दोष नसताना त्यानं मला मारलं. कॉलेज जवळ येऊन धमक्या दिल्या. मी त्याच्याशी बोलणं बंद केलं. फोन करुन धमकी देत होता. अशी प्रतिक्रिया पिडित तरुणीने व्यक्त केली आहे.