मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे बडेनेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर ज्यांच्यावर नाराज होऊन राजीनामा दिला ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंबंधी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
आज बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सुरवातीला वाढदिवसाच्या शुभेच्छा नाना पटोलेंनी दिल्या आहेत. तर बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर पटोले म्हणाले की, बाळसाहेबांचा राजीनामा आमच्याकडे आला नाही. त्याचबरोबर त्यांनी लिहलेली पत्रेही आमच्यापर्यंत आलेले नाहीत.
आमचा बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा झालेली नाही. ते यांच्याशी बोलतच नाही. आम्ही कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या तयारीत आहोत. त्यामुळे आमचा काहीही संपर्क आहे. या संबंधी फक्त बातम्या आहेत. भाजपला काँग्रेस संपवायचा आहे. त्यामुळे या अफवा सुरू आहेत. बाकीचे प्रश्न सोडून काँग्रेसकडे लक्ष भरकटवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही नाना पटोले म्हणाले आहेत.
तर ते म्हणाले की, हायकमांड याकडे लक्ष्य देत आहेत. त्यामुळे मी याकडे लक्ष देत नाही. पक्षाने दिलेलं काम मी करत आहे. बाकी काही मला माहिती नाही. बाकी कोणत्या गोष्टीवर मी बोललं नाही. तर बाळासाहेब यांच्या राजीनाम्यावर आणि पत्रावर त्यांनी ठामपणे उत्तर देत आमच्यापर्यंत यातली कोणतीही गोष्ट आलेली नाही असं ठामपणे नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
तर पुढे ते म्हणाले की, मी नवे राजकारण शिकत आहे. मला बाकी काही माहीत नाही. कोण काय राजकारण मार्ट आहे त्यात मला पडायच नाही. ज्या गोष्टी मला माहीत नाहीत त्या गोष्टींवर मी बोलणार नाही असंही नाना पटोले म्हणालेत.