---Advertisement---

थ्री इडियट्स फेम अखिल मिश्रा यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २१ सप्टेंबर २०२३। बॉलीवूड इंडस्ट्री मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. थ्री इडियट मध्ये ग्रंथपाल ‘दुबे जी’ची भूमिका साकारणाऱ्या अखिल मिश्रा यांचे निधन झाले आहे. किचनमध्ये पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. वयाच्या ५८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, तो एक अपघात होता. किचनमध्ये ते जमिनीवर जखमी अवस्थेत आढळून आले. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. आता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. अखिलच्या पश्चात पत्नी सुझान बर्नर्ट आहे. हा अपघात झाला तेव्हा त्या घरी नव्हत्या. अखिलच्या मृत्यूच्या वेळी त्याची पत्नी मुंबईबाहेर हैदराबादमध्ये होती.

अखिल मिश्रा यांनी ‘डॉन’, ‘वेल डॉन अब्बा’, ‘हजारों ख्वैशीं ऐसी’, ‘3 इडियट्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांना खरी ओळख ‘3 इडियट्स’मधील ग्रंथपाल दुबेजींच्या व्यक्तिरेखेतून मिळाली.  या चित्रपटात त्यांच्यासोबत आमिर खान, शर्मन जोशी, करीना कपूर, आर माधवन, बोमन इराणी यांसारखे दिग्गज कलाकार होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---