Crime News : दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. या घटनेनं अख्खं शहर हादरलं आहे. दरोडेखोरांनी घरात घुसून 80 वर्षीय महिला आणि तिच्या 55 वर्षीय मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. त्यांनंतर दरोडेखोर पसार झाले असून, घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
चंद्रावती लिल्हारे (80) आणि मुलगी फुलवंती सुलाखे (55) अशी मृत दोघांची नावे आहेत.
घटनास्थळी पोहोचलेले पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, सध्या घटनास्थळी हल्लेखोरांबाबत कोणताही सुगावा मिळालेला नाही. मात्र, वस्तुस्थितीच्या आधारे घटनेचा पर्दाफाश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच दरोडेखोर पकडले जातील.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रावती लिल्हारे या वृद्ध महिलेला दोन मुली आणि एक मुलगा आहे. नवरा कर्नाटक येथे रेल्वेत काम करणारी त्यांची लहान मुलगी ज्योती हिच्याकडे गेला आहे. त्यांचा मुलगा व सून दातिया येथे आहेत. त्यांची मोठी मुलगी पतीसोबत भोपाळमध्ये राहते.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या तपासासाठी श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथके तैनात करण्यात आली आहेत. या दोन्ही पथकांनी घटनास्थळावरून नमुने घेऊन आपापल्या पद्धतीने तपास सुरू केला आहे. यासोबतच पोलीस मॅन्युअल आणि इलेक्ट्रॉनिक टेहळणीच्या मदतीने गुन्ह्याच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये ही घटना घडलीय. या घटनेनं अख्खं एमपी शहर हादरलं आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुराव्याच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.