दहशतवाद हे मानवतेवरील संकट; कठोर मुकाबल्याची वेळ

तरुण भारत लाईव्ह । १४ ऑक्टोबर २०२३। दहशतवाद हे किती मोठे आव्हान आहे याची खात्री आता जगाला ही झाली आहे. जगात कुठेही कोणत्याही कारणाने आणि कोणताही स्वरूपातील दहशतवाद हा मानवते वरचे मोठे संकट आहे. अशा दहशतवादी विरोध विरुद्ध कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केल्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन एक्स्पो सेंटर यशोभूमी येथे जी २० देशातील पी २० या नव्या शिखर परिषदेचा उद्घाटन सत्रात मोदी बोलत होते.

यावेळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि आंतरराष्ट्रीय संसदीय संघाचे अध्यक्ष दुआरते पचेको व्यासपीठावर होते. जी २० देशातील संसद प्रमुखांसह जवळपास तीन डझन देशातील संसद प्रमुख आणि अन्य प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यांच्यातील संघर्षाचा स्पष्ट उल्लेख न करता मोदी म्हणाले की जगाच्या कानाकोपऱ्यात आणि आज जे काही घडत आहे त्यापासून कोणी सुटू शकत नाही. संघर्षामुळे जगाला अनेक संघटनांचा सामना करावा लागत आहे. हे कोणाच्याच हिताचे नाही तर मानवते समोरील मोठे संकट आहे वैश्विक संकटांवर मात करत मानव केंद्र विकासाचा आम्हाला विचार करावा लागणार आहे.

जगाची एक पृथ्वी एक परिवार आणि एक भविष्याच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. देशात सार्वत्रिक निवडणुकांना एका मोठ्या सणासारखे महत्त्व असते. स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात सतरा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. याशिवाय विधानसभांच्या निवडणुका ही घेण्यात आल्या. देशात फक्त मोठ्या निवडणुका होतात असे नाही तर निवडणुकांतील लोकांचा सहभाग ही वाढत आहे. लोकसभा निवडणूक ही आतापर्यंतचा इतिहासातील सर्वात मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत ६० कोटी लोकांनी मतदान केले.

२०२४  या लोकसभा निवडणुकीत १०० कोटी म्हणजे एक अब्ज मतदार मतदानाचा हक्क बजावतील असा विश्वास त्यांनी केला. वीस वर्षांपूर्वी आपल्या संसदेवरही दहशतवादी हल्ला झाला होता. विशेष म्हणजे त्यावेळी संसदेच्या अधिवेशन सुरू होते. खासदारांना ओलीस धरत त्याची हत्या करण्याची दहशतवारांची योजना होती. भारत आणि मोठ्या हिमतीने आणि धाडसाने दहशतवादाच्या या समस्येचा सामना केला. दहशतवादाच्या नेमक्या व्याख्येवर जगाचे एकमत होत नाही. जगाच्या या भूमिकेचा मानवतेचे शत्रू गैरफायदा घेत आहे असे मोदी म्हणाले.