दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल रिझल्ट, जाणून घ्या सोपी पद्धत

पुणे : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे लवकरच दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे १ ते ५ जून दरम्यान लागण्याची शक्यता आहे.

दहावी बोर्डाच्या परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत घेण्यात आल्या. दहावीच्या निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे. बोर्डाने निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना तो mahahsscboard.in, mahresult.nic.in वर पाहता येणार आहे.  निकाल जाहीर झाल्यानंतर या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होत आहे. यंदा २३ हजार १० शाळांमधील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल ६१ हजार ७०८ ने कमी झाली आहे.