दहावीचा निकाल जाहीर; असा करा चेक

नवी दिल्ली : सीबीएसईनं १२ वी नंतर १० वी चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी एकूण ९३.१२ टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी बाजी मारली. ९०.६८ मुली तर ८४.६७ टक्के मुलं यावेळी उत्तीर्ण झाली. २०२३ मध्ये एकूण ३८,८३,७१० विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची परीक्षा दिली होती. सीबीएसईच्या अधिकृत आकडेवारीनुसार यावर्षी २१,८६,९४० विद्यार्थिनी आणि१६,९६,७७० विद्यार्थ्यांनी १० वीची परीक्षा दिली.

विद्यार्थ्यांना आपला निकाल उमंग ॲप, SMS, IVRS (इंटरॲक्टिव्ह वॉईस रिस्पॉन्स सिस्टम) आणि अधिकृत वेबसाईट cbse.gov.in, results.nic.in, results.digilocker.gov.in आणि umang.gov.in वर पाहता येणार आहे.

१० वीच्या निकालात त्रिवेंद्रम जिल्हा अव्वल राहिला. तर दुसरीकडे १२ वीचा ८७.३३ टक्के निकाल लागला. हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या वर्षी ९२.१७ टक्के निकाल लागला होता. १२ वी च्या निकालातही त्रिवेंद्रम जिल्ह्यानं ९९.९१ टक्क्यांसह उत्तम कामगिरी केली.

असा पाहा निकाल

निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम cbse.nic.in आणि cbse.gov.in या संकेतस्थळावर जा.
त्यानंतर CBSE Board Result 2023 लिंकवर क्लिक किंवा लॉग इन करा.
यानंतर तुमचा रोल नंबर अथवा रजिस्ट्रेशन नंबर टाका.
त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
यानंतर १०, १२ वी चा रिझल्ट स्क्रिनवर डिस्प्ले होईल.