पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांने घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. इयत्ता दहावीला राज्यात विद्यार्थीनींचा निकाल 95.87% लागला आहे. तर मुलांचा निकाल 92.5% लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% निकाल लागला आहे, तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान बळकावलं आहे.
विभागवार निकाल :
-
- कोकण- ९८.११%
- कोल्हापुर- ९६.७३%
- पुणे- ९५.६४%
- मुंबई- ९३.६६%
- औरंगाबाद- ९३.२३%
- अमरावती- ९३.२२%
- लातूर- ९२.६७%
- नाशिक- ९२.२२%
- नागपूर- ९२.०५%
कुठे पाहाल निकाल?
पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in