मुंबई । सोने हे सर्वात मौल्यवान धातूंपैकी एक आहे. देशात सोन्याला खूप महत्त्व आहे. यात सणासुदीसह लग्नसराईत सोन्याला मोठी मागणी असते. देशातील सोन्याची किंमत त्याच्या जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असते. दरम्यान,यापूर्वी रशिया-युक्रेन दरम्यानच्या तणावात सोन्याच्या किमतीने सगळे रेकॉर्ड मोडले होते. त्यानंतर मध्यंतरी किमती घसरल्या होत्या. मात्र आता इस्त्राईल आणि हमास यांच्या युद्धामुळे सोन्यासह चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतली.
विशेष म्हणजेच ऐन सणासुदीच्या तोंडावर दोन्ही धातूंचे दर वाढल्याने ग्राहकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. आज देशात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 62,100 रुपये इतकी आहे. दुसरीकडे चांदीची किंमत 72,500 रुपये प्रति किलो इतकी आहे.
जळगावच्या सुवर्णनगरी बद्दल बोलायचे झाले तर येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,800 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅम 62,500 रुपये इतकी आहे. चांदीचा दर 73,200 रुपये इतका आहे.