दापोरीमध्ये वादळी पावसामुळे केळी पिकांचे प्रचंड नुकसान, पंचनामे करण्याची मागणी

एरंडोल : तालुक्यातील दापोरी येथे ४ ते २० रोजी झालेल्या वादळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील उभी केळी पूर्णपणे आडवी पडली. तसेच इतर पिकांचे ही नुकसान झाले. तात्काळ पंचनामे करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनीनायब तहसीलदार दिलीप पाटील यांच्याकडे निवेदयाद्वारे केली.

दापोरी ग्रामपंचायतचे सरपंच कुंदन कोळी, उपसरपंच मुकेश मराठे, शेतकरी गणेश पाटील, शरद कोळी, पंकज पाटील, पुंडलिक पाटील, किरण पाटील, मधुकर पाटील, विनोद पाटील, प्रवीण पाटील, मयूर गुजर, प्रशांत कोळी, मिलिंद बाविस्कर, सुधाकर पाटील, रवींद्र पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

नुकसान भरपाईची मागणी
दापोरी शिवारातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित करण्यात यावे. शासन स्तरावरून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.