‘दारू पिऊन महिलेला अरे तुरेची भाषा वापरायची’, हे खपविले जाणार नाही; रक्षा खडसेंचा कुणाला इशारा

रावेर : महायुतीने रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आपल्याला कसा विजय मिळेल, यासाठी दोन्ही उमेदवारांकडून प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, गेल्या दहा वर्षांत खासदार रक्षा खडसे यांनी केलेले चार कामं दाखवावे, असा प्रश्न विरोधकांनी प्रचारादरम्यान उपस्थित केला होता. त्यावर खासदार रक्षा खडसे यांनी ‘चार काय, चारशे कामं  सांगायला तयार आहे, पण व्यवस्थित शिस्तीत बोललं पाहिजे, दारू पिऊन धिंगाणे करायचे आणि एखाद्या महिलेला ‘अरे तुरेची भाषा वापरायची’, हे खपविले जाणार नाहीत, असा इशारा खासदार रक्षा खडसे यांनी दिला आहेत.

आम्ही काम केलेले आहे. आम्ही जनतेपर्यंत पोहोचलेलो आहे. त्याच्यामुळे अशी कोणतीही गोष्ट नाही की ती लपवण्यासारखी आहे. मी तर जग जाहीर सांगेल आणि ऑन द रेकॉर्ड मी सांगते की आम्ही काय काय काम केलेलं आहे आज विरोधकांच्या एक का म्हणतात त्यांच्या विचारांवर मला कीव्ह येते की अशा पद्धतीचा त्यांना कॅम्पिंग त्यांचं करावं लागतंय की दारू पिऊन लोक समोर पाठवतात, असा आरोपही त्यांनी केला.

प्रचारांमध्ये आणि काहीतरी घालतात माझ्याशी अनेक कोणत्याही खालच्या लेव्हलच्या भाषेमध्ये बोलून एक महिला उमेदवार म्हणून हे त्यांना शोभत नाही. राजकारण करायचं , निवडणूक लढायची आहे तर सक्षमपणे पुढे येऊन त्यांनी लढलं पाहिजे, असा सल्लाही त्यानी दिला.

शिवाय असे धंदे करून काही त्यांचं खूप इथे या गोष्टींना पुढे घेऊन जाऊ शकतात. जनता काय एवढी मूर्ख नाहीये जनतेला माहित आहे जनतेवर विश्वास आहे मला की आम्ही जे दहा वर्षांमध्ये केलेला आज रोड आम्ही आपण नॅशनल हायवे बघू शकतात. प्रत्येक जळगाव जिल्ह्यातला लोक आज अनुभवताय रेल्वेच्या माध्यमातून आपण स्टेशन आज एवढे आधुनिक पद्धतीने केलेला आहे.

व्यक्तिगत लाभाचे योजना डायरेक्ट बँक लाभार्थ्यांच्या अकाउंट मध्ये आम्ही पैसे पोहोचतोय काँग्रेसच्या काळात काय होतं आहेत. दलाल होते दलाल यांच्या माध्यमातून कोणाला लाभ मिळायचं किंवा नाही मिळायचं पण आज जो सर्वसामान्य नागरिक आहे त्यांना डायरेक्ट बेनिफिट त्यांच्या बँकेच्या माध्यमातून मिळतो.

आज एवढी मोठी उपलब्ध आहेत केळी पिक विमाचे संदर्भात मी सांगते की सातत्याने आज विरोध किती काय म्हणत असेल, पण हे जनतेला माहिती, शेतकऱ्यांना माहिती की 2014 पासून सातत्याने केळी पिक विम्याचा विषय कोणी लावून ठेवला असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही लावून ठेवलं, जनतेला आजही मी आजही कोणी केळी पिक विमानाला शेतकरी आला समोर त्याला सक्षमपणे मी उत्तर देऊ शकते आणि त्याला विश्वास देऊ शकते किंवा तुमचे पैसे असेल तुमचा तो तुम्हाला 100% पैसे आणून द्यायची गॅरंटी ही माझी राहील एवढंच आम्ही जनतेमध्ये जाऊन काम करतोय.

एवढा विश्वासाने जमीस सांगू शकते ते याचा विचार आपणही केला पाहिजे कारण की आम्ही काम प्रॅक्टिकली करतो. काम करत असताना अडचणी येतात. मी असं म्हणत नाही की 100% दहा वर्षांमध्ये मी पूर्ण मतदार संघ बदलून टाक पण किमान आज काही ना काही प्रत्यक्षामध्ये इथे ग्राउंड वर कामात दिसत आहे. आज लोक ते अनुभवतात म्हणून हे असेच खा लच्या लेवल वर जाऊन जो विरोध कसे दारू पिऊन जर लोक आमचे समोर पाठवत असतील आणि काहीतरी घालत असतील तर त्याला काही अर्थ नाहीये मला त्यांच्या बुद्धीवर क्यू करावीशी वाटते की जर त्यांना खरोखरच काही जनतेसाठी वाटतं त्यांनी सक्षमपणे माझ्या समोर येऊन या सगळ्या प्रश्नांचे जे काही त्यांच्या मनामध्ये उत्तर असतील तर मी सक्षमपणे द्यायला मी तयार आहे.