जळगाव : अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील समता नगरात घडली होती. या अल्पवयीन मुलीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिया संदीप बनसोडे (वय १६, समता नगर, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे.
ती आई, एक मोठी व एक लहान बहीण, आजी, आजोबा, काकू यांच्यासह राहते. आई घरकाम करून उदरनिर्वाह करते. दिया हिने बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास मागील खोलीत जाऊन गळफास लावून घेतला. तिच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी तिला तत्काळ खाली उतरविले. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
याठिकाणी ती बेशुद्धावस्थेत व गंभीर होती. चार दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालविली. तिचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दियाने आत्महत्या का केली याचे कारण अजून समजून आलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास आहेत.