दिलासा! पेट्रोल डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

तरुण भारत लाईव्ह । ५ ऑक्टोबर २०२३। देशात पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत हे सकाळी नागरिकांसाठी जाहीर करण्यात येतात. कधी पेट्रोल डिझेलचे दर वाढतात तर कधी कमी होत असतात. आज पेट्रोल डिझेलचे दर समोर आले असून देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आहेत तर काही ठिकाणी पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत.

मुंबईमध्ये पेट्रोलचे दर हे १०६.३१ आहेत. डिझेलचे दर हे ९४.२७ आहेत. पुण्यात आज पेट्रोल ३३ पैश्यांनी स्वस्त झाले आहे. आणि डिझेल ३२ पैश्यांनी स्वस्त झाले आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर १०५.८४ रुपये इतका आहे तर डिझेलचा दर ९२.३६ इतका आहे. नवी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचे दर हे ९६.७२ इतके आहे. तर डिझेलचे दर हे ८९.६२ इतके आहेत. देशाच्या दक्षिणेकडे म्हणजेच चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर हे १०२.७७ इतके आहेत तर डिझेलचे दर हे ९२.७६इकडे आहेत. कोलकत्ता मध्ये पेट्रोलचे दर १०६.०३ इतके आहेत तर डिझेलचे दर हे ९२.७६ इतके आहेत.

जागतिक बाजारात कच्या तेलाचे दर आज वाढले आहेत. तेलाच्या किमतीत ०.१२ टाक्यांनी वाढ झाली आहे.  डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलची किंमत $८४.३२ प्रति बॅरल इतकी झाली आहे.