मुंबई : दिल्लीत शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची आज (५ ऑक्टो.) बैठक होणार आहे. कार्यकारिणीत शरद पवार मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर शरद पवारांचे पोस्टर लागले आहेत. दरम्यान, उद्या केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. त्या आधीच घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
मात्र, उद्या (६ऑक्टो.) होणाऱ्या सुनावणीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगात ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडणार आहेत. तर अजित पवार गटाच्या वतीने कोण बाजू मांडणार, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अजित पवार गटाने सादर केलेल्या अॅफिडेव्हिटमध्ये सरकारी कर्मचारी आणि मृत व्यक्तीच्या प्रमाणपत्रांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
अजित पवारांच्या अॅफिडेव्हिटमध्ये ६० सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असून, यामध्ये 98 जणाचे अॅफिडेव्हिट शिक्षण संस्थेचे कर्मचारी असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे, तर शरद पवार गटाचे अॅफिडेव्हिट अजित पवार गटापेक्षा चार हजार जास्त असल्याची माहिती आहे.