दिल्लीत साक्षीची जाहीर हत्या करणाऱ्या साहिलला ठोकल्या बेड्या

crime News : राजधानी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात झालेल्या खळबळजनक हत्याकांडातील आरोपी साहिलला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक केली आहे.

शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या व्यक्तीने 16 वर्षीय साक्षीची चाकू आणि दगडाने हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. वादानंतर साहिल साक्षीला थांबवतो आणि तिच्यावर चाकूने हल्ला करतो, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. जेव्हा साक्षी बेहोश होऊन खाली पडते तेव्हा साहिलने तिच्यावर मोठ्या  दगडाने वार करून तिचा खून केला. हत्येनंतर साहिल फरार झाला होता. शाहबाद डेअरी पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 302 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.