दिल्ली कॅपिटल्स : आधीच सर्वच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना, पुन्हा मोठं संकट, काय झालं?

Delhi Capitals IPL 2023 :  आयपीएलच्या १६ वा हंगाम जोमात सुरू आहे. यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. यातील सर्वच सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गुणतालिकेत ते शेवटच्या स्थानावर आहेत. एकीकडे पराभव दिल्लीची पाठ सोडत नसताना दुसरीकडे खेळाडूंवर आणखी एक मोठं संकट उभं राहिलं आहे.


काय झाल?
दिल्ली कॅपिटल्सच्या खेम्यात चोरी झाल्याचे प्रकरण आता समोर आले आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा विमानातून दिल्लीला येत होता. दिल्लीत आल्यानंतर खेळाडूंनी त्यांच्या किटबॅग तपासल्या असता त्यांच्याकडून या सर्व वस्तू गायब होत्या. रिपोर्टनुसार, हरवलेल्या बॅटपैकी ३ बॅट डेव्हिड वॉर्नरच्या, ३ फिल सॉल्टच्या, दोन मिचेल मार्शच्या आणि ५ बॅट यश धुलच्या असल्याचेही सांगितले जात आहे. त्याचबरोबर क्रिकेट किटमधून इतर खेळाडूंचे हातमोजे, शूज आदी सामानही गायब झाल्याची माहिती आहे. विदेशी खेळाडूंच्या या महागड्या वस्तूंची किंमत सुमारे १ लाख इतकी होती.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी दिल्ली कॅपिटल्सनेही तक्रार दाखल केली असून आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. एका सूत्राने सांगितले की, ‘प्रत्येकाच्या किट बॅगमधून काहीतरी गहाळ झाल्याचे ऐकून त्यांना धक्का बसला. अशी घटना पहिल्यांदाच घडली असून लवकरच हे प्रकरण लॉजिस्टिक विभाग, पोलिस आणि नंतर विमानतळावर उचलून धरण्यात आले. तपास सध्या सुरू आहे. तथापि, दिल्ली कॅपिटल्स आयपीएलमध्ये त्यांचा पुढील सामना शुक्रवार, २१ एप्रिल रोजी दिल्लीत कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे.