तरुण भारत लाईव्ह । १५ ऑक्टोबर २०२३। दिल्ली मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली, गाझियाबाद आणि नोएडाच्या परिसरात आज भूकंपाचे धक्के जाणवले. मागच्या दोन आठवड्यात दिल्लीला दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला असून ३.१ रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. या भूकंपाचं केंद्र हरियाणाच्या फरिदाबादमध्ये जमिनीपासून १० किलोमीटर खोल होतं.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रविवारी दुपारी ४ वाजता दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीआरमधील फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गुरुग्राममध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे दिल्लीसह आसपासच्या परिसरात बराच वेळ जमीन हादरत होती. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.
आज दुपारीच पश्चिम अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. तालिबानच्या ताब्यात असलेला हा देश अजून त्या धक्क्यामधून सावरला नाही. अशातच आज पुन्हा एकदा अफगाणिस्तानात भूकंप झाला.