दिल्ली हत्याकांड प्रकरणी गौतम गंभीरने केला संताप व्यक्त, म्हणाले..

नवी दिल्ली : साक्षी या १६ वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्येवर क्रिकेटपटू गौतम गंभीरने ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला आहे. हत्या होत असाताना आजुबाजुचे लोकं निमुटपणे येत जात पाहत राहिले. पण आरोपीला असे घृणास्पद कृत्य करण्यापासून कोणीही रोखण्याचा प्रयत्न केला नाही. जर त्यांच्या बहिणीवर किंवा मुलीवर असा रानटी हल्ला झाला असता तर हे लोक असेच ये-जा करत राहिले असते का? असा सवाल त्यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे.
गंभीरच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, काही व्यक्तींनी त्याच्या विधानाचे समर्थन केले आहे. वडील न्यायाची मागणी करत आहेत. दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात २९ मे रोजी सकाळी ही घटना घडली, जिथे साहिल सरफराज नावाचा मुलगा याने 16 वर्षांच्या मुलीवर अनेक वार केले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. आरोपीने चाकूने सुमारे 40 वार करून तिचे डोके दगडाने ठेचले आणि घटनास्थळावरून पळ काढला. सुदैवाने उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.
साक्षीच्या वडिलांनी सांगितले की, “आरोपी साहिल सरफराजला कठोर शिक्षा हवी आहे. माझ्या मुलीवर अनेक वेळा वार करण्यात आले, तिची आतडी बाहेर आली आणि तिच्या डोक्याचेही चार तुकडे करण्यात आले. आम्ही आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करतो.”असे ते म्हणाले. त्यांना साहिलबद्दल काहीही माहिती नाही. “मी साहिलला ओळखत नव्हतो. ते मित्र होते की भांडण झाले हे मला माहीत नव्हते. मी त्याच्याबद्दल किंवा त्याच्या कोणत्याही मित्रांबद्दल ऐकले नाही,” अशी माहिती त्यांनी दिली.