दिल्ली-एनसीआरसह इतर अनेक देशांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भारतातील दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त जम्मू-काश्मीर, पंजाब आणि हरियाणामध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. उत्तर भारताव्यतिरिक्त अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही भूकंप झाला.
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे मुख्य केंद्र अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात होते. उझबेकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या आठवड्यात भारताच्या पश्चिम बंगालमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.