दिवाळीत सर्वसामान्यांना बसणार महागाईचा चटका! तूरडाळ गाठणार ‘हा’ दर

जळगाव । यंदा म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीय. पावसाअभावी उत्पदनात घट होण्याची भीती आहे. आता याचा फटका आगामी दिवसात सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण उत्पदनात घट झाल्यास आगामी दिवसात डाळींच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या तूर डाळीचे भाव १८० रुपयांवर भिडले असून दिवाळीत तूर डाळ प्रतिकिलोला २०० रुपयांचा भाव तर घेणार नाही, असा प्रश्न आतापासूनच उपस्थित होऊ लागला आहे.

तूर डाळीचा स्टॉक कमी प्रमाणात बाजारपेठेत आल्याने दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कोल्हापूरमधील लक्ष्मीपुरी धान्य लाइनमध्ये येणारी ही तूर डाळ विदर्भ, मराठवाडा, खान्देश भागातून येते. विशेषत: बार्शी, लातूर, जळगाव, उदगीर आदी भागांतून तूर डाळ अधिक प्रमाणात येते. गेल्या वर्षी तूर डाळीच्या क्षेत्रात घट झाली. घट झालेल्या क्षेत्रात सोयाबीन, कापूस, अन्य पिकांचे क्षेत्र वाढले. त्यातही सोयाबीनला दर अधिक मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर डाळीपेक्षा सोयाबीन पेरणी अधिक केली. तूर डाळीचे क्षेत्र घटले. विशेष म्हणजे, या वर्षीच तूर डाळ १५० रुपये किलो गेलेली नाहीय. मागील काही काळात असाच दराचा भडका उडाला होता.

जळगावात मुगदाळचा दर काय?

जळगावच्या बाजारपेठेत मूग दाळ १३० ते १४० तर उडीद डाळ १३२ ते १३८ रुपये प्रतिकिलोने विक्री झाली. गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदाचे भाव जास्तच असल्याचे सांगण्यात आले. यंदा पाऊस लांबल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या डाळीही महागण्याची शक्यता आहे.

हरभरा डाळ ९० रुपयावर
मागील काही वर्षात हरभरा डाळीचे दर काहीसे वाढले आहे. बुधवारी जळगावात हरभरा डाळीचा दर हा ९० ते ९५ रुपयावर आहे. जेव्हा दसरा दिवाळी येते तेव्हा यात पाच ते दहा रुपयाची वाढ होते.

तूरडाळ १७० रुपयावर
जळगावात सध्या तुरडाळीची १७० ते १८० रुपये प्रति किलोने विक्री सुरु आहे.